breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

मूर्ख आहात का? कसल्या अंगार-भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या

बीड |

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न देता भाजपाचे नेते भागवत कराड यांना मंत्रीपदाची देण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं समोर आलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा रोष निर्माण झाला होता. अद्यापही प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. याचाच प्रत्यय भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आला. नवनियुक्त मंत्री भागवत कराड यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरुन सुरु झाली. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि यात्रेला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बीडमधील परळीतून या यात्रेला सुरूवात केली. प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. यावेळी यात्रे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. या घोषणाबाजीवरुन पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर चांगल्याच भडकल्या. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलंच झापलं. “मी शिकवलं आहे का तुम्हाला असं वागायला. मुंडे साहेब अमर रहे या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. काय अंगार-भंगार घोषणा लावलीय? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. जेवढ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वत:ची नाहीतर मला भेटायला यायचं नाही”; असे म्हणत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवरच संतापल्या.

केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील पाच लोकसभा मतदारसंघांत प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाडय़ातील सात लोकसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाणार आहे. तर नारायण राणे यांची यात्रा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत ही यात्रा ६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button