मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथील शिवसंपर्क अभियानाच्यासभेत भाजपवर सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरे यांच्यावर मुन्नाभाई म्हणत अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्र्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मध्ये एका शिवसैनिकानं विचारलं, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? मी विचारलं कारे, तर तो म्हणाला की त्यात मुन्नाभाईला गांधीची दिसतात, त्यानंतर तो गांधीगिरी करतात. तशी एक केस आपल्याकडे आहे, त्याला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. कधी शाल घेऊन फिरतात, कधी मराठीचा मुद्दा घेतात आणि कधी हिंदुत्च्वाचा मुद्दा घेतात. लगे रहो मुन्नाभाई मधला तो मुन्नाभाई लोकांची कामं करायचा, असं म्हटलं. तर, शिवसैनिक म्हणला तसं नाही, लगे रहो मुन्नाभाईला शेवट कळतं की आपल्या मेदूत केमिकल लोचा झाला होता. सध्या मुन्नाभाई फिरत आहेत, फिरु द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाईचं उदाहरण देत नाव न घेता टीका केली.