समीर भालेकर यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पिंपरी चिंचवड | समीर राजू भालेकर यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी भालेकर यांना माजी मंत्री सुनिल देशमुख, प्रभारी सोनल पटेल माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रक दिले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (ओबीसी विभाग) प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी भालेकर यांना नियुक्तीपत्र दिले. भालेकर यांनी आजवर विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. तालुका उपाध्यक्ष, सुतार समाजाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कामही केले आहे.
त्यावेळी पुणे जिल्ह्यातील सुतार समाज समन्वयक विद्यानंद मानकर, विश्वकर्मा मंदिर अध्यक्ष भगवान श्राध्ये, युवा अध्यक्ष सुतार समाज सचिन सुरसे,पुणे शहर समन्वयक दीपक भिलारे, ग्रामपंचायत सदस्य शंकर गाडे, अक्षय गाडेकर, प्रदीप दाभाडे, संतोष भालेराव, गौरव भोसले, संकेत भालेकर, राहुल भोसले, कुणाल आगळे, प्रमोद दिवेकर, सुरेश हेमाडे, आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.