breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सेवानिवृत्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी निवृत्त लेखापाल, उपलेखापालाची नेमणूक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्त प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लेखा विभागाच्या पेन्शन कक्षासाठी महापालिकेमधून सेवानिवृत्त झालेल्या आणि इतर कामांची माहिती असलेल्या निवृत्त लेखापाल आणि उपलेखापाल अशा दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी मानधनावर ही नेमणूक केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या कर्मचारी सेवानिवृत्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. या सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच मृत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे. तथापि, लेखा विभागाकडील मर्यादीत कर्मचारी संख्या विचारात घेता सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.

कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांबाबत महापालिकेने 5 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक आयोजित केली होती. बैठकीतील सभावृत्तांतामध्ये जे महापालिकेचे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सेवानिवृत्तीच्या कामकाजाची ज्यांना माहिती आहे, अशा दोन कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता देय असलेल्या रकमा देण्याकरिता लेखा विभागाने मानधनावर स्वतंत्र नियुक्ती करावी, असे नमूद करण्यात आले होते.

ही बाब विचारात घेऊन सेवानिवृत्त प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लेखा विभागाच्या पेन्शन कक्षासाठी सेवानिवृत्त झालेल्या व इतर कर्मचाऱ्यांपैकी सेवानिवृत्त लेखापाल वसंत शिंदे आणि उपलेखापाल बाजीराव ऑबळे या दोन कर्मचाऱ्यांची 18 डिसेंबर 2020 रोजी सहा महिने कालावधीसाठी नेमणूक केली होती. हा कालावधी संपला असून, अद्याप सेवानिवृत्ती प्रकरणांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिंदे व ओंबळे यांची पुन्हा सहा महिन्यांसाठी मानधनावर नेमणूक केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button