पिंपरी / चिंचवड

गांजा ओढणाऱ्या दोघांना अटक : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरी येथील कै आकुंशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजूला भर दिवसा गांजा ओढत बसलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 13) दुपारी सव्वाबारा वाजता करण्यात आली.

ईश्वरसिन्हा छत्तरसिंग गोड (वय 35, रा. भोसरी), विजय महादेवराव राख (वय 21, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक मनोज बन्सीलाल राठोड यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वरसिन्हा व विजय रविवारी दुपारी भोसरी येथील कै अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या सीमाभिंतीजवळ गांजा ओढत बसले होते. याबाबत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यावेळी दोघेजण तपकिरी रंगाच्या चिलीममध्ये गांजा भरून ओढत होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 150 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायदा कलम 8 (क), 27, 29 नुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलीस हवालदार रमेश भोसले तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button