breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गौतम अदानींच्या कंपनीला आणखी एक कंत्राट; देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी वीज उत्पादक कंपनीला पुरवणार कोळसा

नवी दिल्ली |

देशातील आघाडीच्या उद्योगांपैकी एक असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादक कंपनीला परदेशी कोळसा पुरवठा करण्याचे मोठे काम मिळाले आहे. गेल्या वर्षी देशात कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीसह अनेक कामांवर परिणाम झाला होता. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या ऑक्टोबरमध्ये सरकारी मालकीच्या एनटीपीसी लिमिटेडने दोन वर्षांत प्रथमच कोळसा आयातीसाठी निविदा काढली. त्यानुसार ही जबाबदारी देण्यात आली आहे. देशात आयात करण्यात येत असलेला थर्मल कोळशाचे सर्वात मोठे व्यापारी असलेल्या अदानी यांना वीज कंपनीला दहा लाख टन कोळसा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सरकारी मालकीची दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन लिमिटेड कोलकाता देखील अदानींकडून त्यांच्या पॉवर प्लांटना समान प्रमाणात पुरवठा करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. भविष्यात हा करार होण्याची शक्यता आहे. कोळशाच्या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे देशांतर्गत वीज उत्पादकांवर त्यांचा साठा वाढवण्याचा दबाव आहे. वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षी देशाला टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे काही राज्यांमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आणि विजेवर चालणाऱ्या उद्योगांवर याचा परिणाम झाला. इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार वचनबद्ध असतानाही परदेशातून कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वीजनिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन ऊर्जेच्या साधनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत असले तरी पुढील काही वर्षांमध्ये त्याचा वापर वाढण्याचा अंदाज आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये, अदानी समूहाला १७,००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चात मेरठ ते प्रयागराज या ५९४ किमी लांबीच्या सहा पदरी गंगा एक्सप्रेसवेचे काम मिळाले होते. यामध्ये आयआरबी पायाभूत सुविधा विकासकांचाही समावेश आहे. हा  एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे असल्याचे सांगितले जाते. विरोधक भाजपावर अदानी-अंबानी यांच्यावर मेहेरबान असल्याचा आरोप करत असतानाच अदानी समूहाला गंगा एक्स्प्रेस वेचे काम मिळणे हा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. अदानी समूह गंगा एक्स्प्रेस वेमध्ये बुडौन ते प्रयागराजपर्यंत ४६४ किमीचा रस्ता बांधणार आहे. ज्यामध्ये या प्रस्तावित द्रुतगती मार्गाचे ८० टक्के काम तीन टप्प्यांमध्ये समाविष्ट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button