breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाड तालुक्यात आणखी एक दुर्घटना; हिरकणीवाडीतही दरड कोसळली

रायगड – जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावातील अनेकांचे बळी गेल्याच्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेनंतर याच तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी अथवा घरांचे नुकसान झालेले नाही. मात्र खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांचे जवळच्या पाचाड गावात स्थलांतर करण्यात आले आहे.

महाड शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या दरड कोसळल्याच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून इथले नागरिक प्रचंड घाबरले आहेत. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे डोंगराजवळ असणाऱ्या गावांमध्ये भीतीदायक चर्चा सुरू झाल्या आहेत. महाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून हा डोंगराळ भाग असल्याने येथे तत्काळ मदत पोहोचविणेही जिकिरीचे आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button