breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगरात नवोदय विद्यालयात कोरोनाची आणखी ३३ जणांना लागण

अहमदनगर | प्रतिनिधी 

एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजली. शाळांमधून मुलांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. शाळेत जायला मिळणार म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला होता. परंतु शाळा सुरु झाल्या आणि अहमदनगरच्या शाळेत कोरोनाचा स्फोट झाला आहे. नगरच्या एका शाळेत पुन्हा एकदा कोरोनाचे ३३ रूग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी इथल्या नवोदय विद्यालयात आणखीन ३३ रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी याच विद्यालयातील काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर विद्यालयातील ४२८ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यात ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. या सर्व कोरोनाबाधितांवर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी नवोदय विद्यालयात १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. या विद्यार्थ्यांना पारनेर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना ताप जाणवत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button