breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

संतापजनक! मॅट्रिमोनिअल साईटवरून १२ उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढून लैंगिक शोषण

मुंबई – मॅट्रिमोनिअल साईटवरून १२ उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेश उर्फ करण गुप्ता असे या ३२ वर्षीय नराधमाचे नाव असून तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पोलीस गेल्या चार महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतील मालाड भागातून त्याला अटक करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले अनेक खोटे अकाऊंट तयार केले होते. वेबसाईटच्या माध्यमातून महिलांच्या संपर्कात आल्यानंतर तो त्यांना पब, रेस्तराँ किंवा मॉलमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे.

तसेच पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी महिलांचे लैंगिक शोषण करत असे. तो दरवेळी गुन्हा करताना वेगळा मोबाईल क्रमांक वापरत असे. तो दरवेळी सीम कार्ड बदलत होता. ओला किंवा उबर बूक करतानाही तो आपलं सीम कार्ड बदलत होता. आपल्या नावे नोंदणी असणारा क्रमांक तो वापरत नव्हता. त्याने हॅकर म्हणून काम केलं असून त्याला कॉम्प्युटरची चांगली माहिती आहे. शिवाय तो एका प्रतिष्ठित संस्थेत शिकला असून त्याने अनेक मोठ्या कंपन्यांसाठी काम केलं आहे. मात्र हे सगळं कौशल्य तो चुकीच्या ठिकाणी वापरत होता. आतापर्यंत त्याने १२ महिलांची फसवणूक केल्याची माहिती आम्हाला मिळाली असून ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.’ त्याचबरोबर, आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button