TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रूपीनगर येथे सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

पिंपरी | सुभेदार मल्हारराव होळकर आपल्या पराक्रमाने स्वबळावर मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्यासाठी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. मल्हारराव होळकर यांनी लाहोरच्या पुढे जावून अटक येथे मराठ्यांचा भगवा ध्वज फडकावला.

स्वराज्याचा भगवा ध्वज अटकेपार दिमाखात फडकवणाऱ्या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार आणि होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती रूपीनगर तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाणच्या वतीने अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वाराजवळ साजरी करण्यात आली. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार कमाणीसाठी जागा उपलब्ध करून देणारे माजी स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांचा प्रतिष्ठाण तर्फे विशेष सन्मान करण्यात आले व समाज बांधवांनी भालेकर यांचे आभार मानले. माजी नगरसेवक शांताराम भालेकर, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, माजी स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, उद्योजक श्यामराव भालेकर, बाळासाहेब भालेकर, रामभाऊ भालेकर, रामदास कुटे, सागर चव्हाण, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, दत्ता करे, सुनील बनसोडे, सचिन नायकुडे, कार्याध्यक्ष शिवाजी बिटके, नितीन वाघमोडे, नाना गावडे, संजय रुपनवर, वैजनाथ सुरवसे, दयानंद सोनटक्के आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button