ऍण्ड दी ऑस्कर गोज टू…नोमडलँड! वाचा, विजेत्यांची यादी एका क्लिकवर
लॉस एंजेलिस – सिनेसृष्टीत सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ आज कोरोना संकटातही मोठ्या थाटात पार पडतोय. लॉस एंजेलिसच्या युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून अनेकांनी व्हर्चुअल पद्धतीने सोहळ्याला हजेरी लावली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या ९३व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे, तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. एकूणच ‘नोमडलँड’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावत 2021 सालच्या ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
दरम्यान, यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’, ‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या चित्रपटांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार आज पहाटे ५.३० वाजल्यापासून सकाळी ८.३० वाजेपर्यंत पार पडला. जगभरातल्या कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा हा ऑनलाईन सोहळा ऑस्करच्या oscars.com या ऑफिशिअल वेबसाईटवरून आणि ऑस्करच्या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित करण्यात आला.
ऑस्कर २०२१