breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ऍण्ड दी ऑस्कर गोज टू…नोमडलँड! वाचा, विजेत्यांची यादी एका क्लिकवर

लॉस एंजेलिस – सिनेसृष्टीत सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ आज कोरोना संकटातही मोठ्या थाटात पार पडतोय. लॉस एंजेलिसच्या युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून अनेकांनी व्हर्चुअल पद्धतीने सोहळ्याला हजेरी लावली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या ९३व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे, तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. एकूणच ‘नोमडलँड’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावत 2021 सालच्या ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

दरम्यान, यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’, ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या चित्रपटांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार आज पहाटे ५.३० वाजल्यापासून सकाळी ८.३० वाजेपर्यंत पार पडला. जगभरातल्या कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा हा ऑनलाईन सोहळा ऑस्करच्या oscars.com या ऑफिशिअल वेबसाईटवरून आणि ऑस्करच्या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित करण्यात आला.

ऑस्कर २०२१

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)
सर्वोत्कृष्ट अभिनेते : अँथनी हॉपकिंस (द फादर)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमेडलँड
संगीत (Original Song) : ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या चित्रपटातील ‘फाइट फॉर यू’
संगीत (Original Score) : ‘सोल’ (ट्रेंट रेंजर, ऍटिकस रॉस, जॉन बतिस्टे)
चित्रपट संकलन : साऊंड ऑफ मेटल (मिकेल नेल्सन)
छायांकन : मँक (एरिक मेसेर्शमिट)
प्रोडक्शन डिझाईन : मँक ( प्रोडक्शन डिझाईन – डोनाल्ड ग्रॅहम बर्ट, सेट डेकोरेशन – जॅन पास्कल)
सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग (मिनारी)
व्हिज्युअल इफेक्ट्स : टेनेट (अँड्यू जॅकसन, डेव्हिड ली, अँड्यू लॉकली, स्कॉट फिशर)
माहितीपट (Short Subject) : कोलेट (अँटनी गिआचिनो, ऍलिस डोयार्ड)
ऍनिमेटेड फिचर फिल्म : सोल
लघुपट (Animated) : इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू
लघुपट (Live Action) : टू डिस्टंट स्ट्रेंजर्स
ध्वनी : साऊंड ऑफ मेटल (निकोलस बेकर, जेमी बक्श्त, मायकल कोटोलेंक, कार्लोस कोर्तेस, फिलीप ब्लाध)
दिग्दर्शन : नोमॅडलँड (Chloé Zhao)
वेशभूषा : माय रेनीस ब्लॅक बॉटम (ऍन रोथ)
रंगभूषा आणि केशभूषा : माय रेनीस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेज रिवेरा, मिया निल, जेमिका विल्सन)
सहाय्यक अभिनेता : डॅनियल कलूया (जूदास ऍण्ड ब्लॅक मसिहा)
आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राऊंड (डेन्मार्क)
लेखन (Adapted Screenplay) : द फादर (ख्रिस्तोफर हँप्टन, फ्लोरेन झेलर)
लेखन (Original Screenplay) : प्रॉमिसिंग यंग वूमन (एमरल्ड फेनेल)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button