breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

सांगलीच्या लोहार कुंटुंबाने आनंद महिंद्रांची ऑफर नाकारली; म्हणाले, “त्यांना अशी गाडी हवी तर…”

सांगली |

सांगलीतील देवराष्ट्रे गाव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. याचं कारण ठरलं या गावातील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली अनोखी जुगाड जीप. त्यांनी घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून एक भन्नाट जीप तयार केलीय. ते स्वतः फॅब्रिकेशनचं काम करतात. विशेष म्हणजे दुचाकी प्रमाणे ही जीप किक मारून चालू होते. या जीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर तो थेट महिंद्रा समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहचला. महिंद्रा यांनाही ही जीप पाहून कौतुक वाटलं आणि त्यांनी या लोहार कुटुंबाला एक ऑफर दिली. मात्र, लोहार कुटुंबाने नम्रतेने ही ऑफर नाकारली आहे.

आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांच्या कल्पकतेचं कौतुक केलं. तसेच ही जीप महिंद्रा रिसर्च व्हॅलीत ठेवण्यासाठी मागितली. या बदल्यात महिंद्रा लोहार कुटुंबाला एक बोलेरो गाडी भेट देण्याची ऑफर दिली. मात्र, लोहार कुटुंबाने त्यांची ही पहिली जीप महिंद्रा यांना देण्यास नम्रपणे नकार दिला. आनंद महिंद्रा म्हणाले, “ही गाडी नियमांमध्ये बसत नाही, पण म्हणून मी स्वतःला ही गाडी बनवण्यामागील कल्पकता आणि टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याच्या क्षमतेचं कौतुक करण्यापासून रोखणार नाही.”

“नियमांचं उल्लंघन होत असल्याने स्थानिक प्रशासन कधीनाकधी ही गाडी रस्त्यावर चालवण्यापासून रोखतीलच. मी व्यक्तीशः या गाडीच्या बदल्यात त्यांना बोलेरो गाडीचा प्रस्ताव देतो. त्यांनी बनवलेली ही गाडी महिंद्रा रिसर्च व्हॅलीत प्रदर्शनासाठी ठेवली जाईल. ही गाडी आम्हाला प्रोत्साहन देईल. संसाधनांनी परिपूर्ण म्हणजे कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त काम करणं होय,” असंही आनंद महिंद्रा यांनी नमूद केलं. याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना दत्तात्रय लोहार म्हणाले, “माझी गाडी आनंद महिंद्रा यांना आवडली याचा मला खूप आनंद वाटतो. पण त्यांनी देऊ केलेली गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही.”

यावर दत्तात्रय लोहार यांच्या पत्नी राणी लोहार यांनी देखील आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “ते आम्हाला नवी गाडी देत आहेत, पण त्यांना आमची ही गाडी हवी आहे. पण आम्ही ही गाडी खूप हालाकीच्या परिस्थितीत तयार केलीय. २ वर्षांपासून साहित्य गोळा केलंय. मागील ५-६ महिन्यापासून या गाडीचा वापर सुरू आहे. या गाडीमुळे आमची खूप बचत झाली. ही पहिली लक्ष्मी आहे त्यामुळे आम्हाला ती देऊ वाटत नाही. ही गाडी तयार केल्यानंतर पहिल्यापेक्षा आमचं चांगलं सुरू आहे.” “आम्हाला पहिली केलेली ही लक्ष्मी देऊ वाटत नाही. आम्ही त्यांना दुसरी गाडी बनवून देऊ. त्यांनी आम्हाला नवी गाडी द्यावी अशी आमची मागणी नाही, पण त्यांनी स्वखुशीने दिली तर आम्ही त्यांची गाडी घेऊ,” असंही राणी लोहार यांनी नमूद केलं.

  • गाडी बनवणारी व्यक्ती कोण?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही गाडी बनवणारी व्यक्ती महाराष्ट्रामधील सांगली येथील असल्याची माहिती समोर आली. अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी दुचाकीचे इंजिन, चारचाकी गाडीचं बोनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करुन ६० हजारांमध्ये ही भन्नाट किक स्टार्ट जिप तयार केलीय. स्वत:चं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप असणाऱ्या दत्तात्रय यांनी जुगाड करुन तयार केलेली ही जिप ४० ते ४५ किलोमीटर प्रवास एक लिटर पेट्रोलमध्ये करते. सध्या त्यांच्याकडे अनेकांनी अशाप्रकारची जीप बनवून देण्याची ऑर्डर दिल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं. आनंद महिंद्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय यांच्या कारनाम्याची चर्चा देशभरात होताना दिसतेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button