breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विनाअनुदानित घरगुती वापराचा गॅस सिलिंडर १५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली – १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरनंतर आता आजपासून घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हा गॅस सिलिंडर मुंबई आणि दिल्लीत ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये झाला आहे. या दरवाढीमुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरने हजारी पार केल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

एका बाजूला जवळपास रोजच होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना आता गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसला आहे. १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरनंतर आज घरगुती वापराच्या १४.२ किलो विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीत तो ९०० रुपये झाला आहे. कोलकात्यात ९२६ रुपये आणि चेन्नईत ९१५.५० रुपये एवढी त्याची किंमत झाली आहे. सप्टेंबरमध्ये या गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १८ ऑगस्टला गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागला होता. असे असताना आता तो पुन्हा १५ रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button