breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

…अन् गव्हाच्या शेतातच भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने केलं Emergency लॅण्डिंग

नवी दिल्ली |

हरियाणामधील जींद जिह्यामध्ये रविवारी भारतीय लष्कराचं एका हेलिकॉप्टरला गव्हाच्या शेतामध्ये इमरन्सी लॅण्डिंग करावी लागलीय. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर थेट शेतात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार जवान प्रवास करत होते. हे चौघेही सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर गव्हाच्या शेतात उतरल्याचं समजताच हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये गव्हाच्या शेतात हेलिकॉप्टर उतरल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या तांत्रिक मदत पोहचवणाऱ्या तुकडीला पाचारण करण्यात आलं. पोलीस अधीक्षक असणाऱ्या कुलदीप सिंग यांनी, “लष्कराचं हेलिकॉप्टर शेतात लॅण्ड झालं. त्यामध्ये प्रवास करत असणारे सर्वजण सुरक्षित आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही,” असं कुलदीप म्हणाले.

“लष्कराचं एएलएच ध्रुव एआय-११२३ हेलिकॉप्टर पंजाबमधील भटिंडा येथून दिल्लीला जात होतं. त्याचवेळी त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटने हे हेलिकॉप्टर जाजनवाला गावातील शेतात उतरवण्याचा ठरवलं. हे हेलिकॉप्टर जबर सिंग नावाच्या व्यक्तीच्या गव्हाच्या शेतात उतरवण्यात आलं,” असंही सिंग यांनी सांगितलं. “यामध्ये हेलिकॉप्टरला कोणतंही नुकसान झालेलं नाही. तसेच त्यामधून प्रवास करणारेही सर्वजण सुखरुप आणि सुरक्षित आहेत,” असं कुलदीप सिंग म्हणाले.

गावातील शेतात हेलिकॉप्टर उतरल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि गावकरी त्यातही खास करुन तरुण मंडळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळा झाल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढण्यासाठीही मोठी गर्दी झालेली. लष्कराने जारी केलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर पुन्हा भटिंडाला पाठवण्यात आलं असून त्याच दिवशी म्हणजेच रविवारीच ते भटिंडाला पोहचलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button