Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चुलत भावांचा गाळात फसून दुर्दैवी मुत्यु झाल्याची घटना

जालनाः ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चुलत भावांचा गाळात फसून दुर्दैवी मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे काल रविवारी (दि.३१) दुपारी ही घटना घडली. गणेश पांडुरंग घुंगासे (१४) महेश लक्ष्मण घुंगासे (५,रा.दाढेगाव), अशी मृतांची नावे आहेत. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दाढेगाव येथील पांडुरंग रामा घुंगासे व लक्ष्मण रामा घुंगासे दोन्ही चुलत भाऊ असून, लक्ष्मण घुंगासे हे शेतात राहतात. त्यांची पत्नी आजारी पडल्यामुळे लक्ष्मण यांनी मुलांना गावात आणून सोडले होते. शहापूर येथील ओमशांती शाळेत ८वी च्या वर्गात शिकणारा गणेश घुंगासे हा काल शाळेला सुट्टी असल्याने चुलत भाऊ महेश सोबत शेताकडे सायकलवर निघाला होता. रस्त्यामध्ये असलेल्या ओढ्यात पाणी वाहत असल्याने दोघानाही पोहण्याची लहर आल्याने कपडे व चपला काठावर काढून दोघं ओढ्यात उतरले. सुरुवातीला गणेशने पाण्यात उडी मारली आणि तिथेच घात झाला. ओढ्यातील डोहात गाळ असल्याने तो गाळात फसला.

भाऊ गाळात फसल्याचे पाहून लहानग्या महेशनेही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि तोही गाळात फसला. गाळातून निघण्याच्या प्रयत्नात ते अधिकच फसत गेले. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, काही गावकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात शोध घेत दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. गणेश हा पांडुरंग घुंगासे यांचा एकुलता एक मुलगा होता. दोन्ही भावांवर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही भावांवर असे अचानक आभाळ कोसळल्याने गावकरी देखील हळहळले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button