breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कोविड सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला, अन् मुलगी खिडकीत अडकली

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील एरंडवण्यातील महिला सेवा मंडळाच्या क्वारंटाइन सेंटरमधून एका18 वर्षीय मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, खिडकीच्या गजामधून पळून जाताना मुलगी गजामध्येच अडकली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन मुलीची सुटका केली.

एरंडवणा येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. एरंडवणा अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घाबरलेल्या मुलीला धीर देत हायड्रालिक कटर च्या साह्याने खिडकीचा गज तोडून मुलीची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 18 वर्षांच्या मुलीने सेंट्रल मॉलजवळ असलेल्या महिला सेवा मंडळ क्वारंटाइन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या गजामधून रात्री साडे अकराच्या सुमारास पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी दिल्ली येथील राहणार आहे. पण, जागा कमी असल्यामुळे ही मुलगी खिडकीमध्येच अडकली. खिडकीत अडकल्यानंतर या मुलीने आपल्याला बाहेर काढण्यासाठी आरडाओरडा केला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, यात त्यांना यश आले नाही.

एरंडवणा अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि जवानांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत घाबरलेल्या मुलीला धीर देत हायड्रालिक कटरच्या साह्याने खिडकीचे गज तोडून सदर मुलीची सुखरूप सुटका केली. सुटकेनंतर मुलीला महिला सेवा मंडळाच्या व्यवस्थापिकेच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी डेक्कन पोलीस घटनास्थळी हजर होते. एरंडवणा अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर राजेश जगताप यांच्यासह सब ऑफिसर संतोष कार्ले प्रभारी तांडेल राजेंद्र पायगुडे,फायरमन राजेंद्र भिलारे, कैलास पवार, निलम शहाणे, मंदार नलावडे, ड्रायव्हर राकेश नाईक नवरे आणि पांगारे यांनी यावेळी महत्वाची भूमिका निभावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button