पिंपरी / चिंचवड

सिक्युरिटी कंपनीत काम करणा-या अकाऊंटंटने कंपनीला घातला साडेआठ लाखांचा गंडा

पिंपरी l प्रतिनिधी

सिक्युरिटी कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करणा-या दोघांनी सिक्युरिटी गार्डची खोटी हजेरी लाऊन पगाराव्यतिरिक्त जास्त रक्कमेची बिले काढून कंपनीची आठ लाख 64 हजार 457 रुपयांची फसवणूक केली. हे घटना जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत एसआयएस सिक्युरिटी अंड इंटेलिजन्स सर्विस लिमिटेड, मोशी येथे घडली.

मनीष शशिकांत राय (वय 30, रा. न-हे, पुणे), आनंद कुमार (वय 29, रा. मोशी प्राधिकरण, मूळ रा. बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र बंगाली कुमार (वय 40, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मोशी येथे  एसआयएस सिक्युरिटी अंड इंटेलिजन्स सर्विस लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीच्या कार्यालयात आरोपी अकाऊंटंट म्हणून काम करत होते. आरोपींनी कंपनीच्या ईआरपी सिस्टीममध्ये सिक्युरिटी गार्डची खोटी हजेरी लावली. पगाराव्यतिरिक्त जास्त रकमेचे बिल काढून टी रक्कम कंपनीचे सिक्युरिटी गार्ड आणि ओळखीच्या इतर लोकांच्या बँक खात्यात जमा करून कंपनीची आठ लाख 64 हजार 457 रुपयांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button