breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अमृत महोत्सवी वर्ष ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे होणार- बच्चू कडू

अकोला |

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे जिल्ह्यत ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. जिल्ह्यचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुढे ते म्हणाले, करोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, सेवाभावी संस्था यांनी चांगले काम केले. प्राणवायू पुरवठय़ाची मोठी जोखीम होती, मात्र वर्षभरात प्रयत्नपूर्वक प्राणवायू पुरवठय़ाची परिपूर्णता करून कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यत ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करू. जिल्ह्यसाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतानाच सामान्य माणसांच्या हिताचे विषय मार्गी लावण्यासाठी कार्य करेल. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकूल’ हा प्रकल्प कार्यान्वित करू. अनाथांनाही हक्काचे घर देण्यात येईल. सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचवण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबवणार आहे. देशाचा नागरिक हा बलशाली असावा तसेच तो नागरिक तक्रारमुक्त, चिंतामुक्त व आरोग्य युक्त असावा, यासाठी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सूत्रसंचालन शेखर गाडगे यांनी केले. स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यत ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करू. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकूल’ हा प्रकल्प कार्यान्वित करू. अनाथांनाही हक्काचे घर देण्यात येईल. सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचवण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button