TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अमिताभ बच्चन : 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

बॉलिवूडचे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले मेगास्टार आज करोडोंच्या घरात आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे बिग बी करोडपती झाले आहेत. एक छोटीशी गोष्ट त्यांनी केली आणि आज ते मालामाल झाले आहे आणि तेही फक्त 75 रुपयांमध्ये…

करोडपती स्टॉक

अमिताभ बच्चन यांनी एका छोट्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. पाच वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आलेली आयपीओमध्ये त्यांनी 75 रुपयांचे शेअर खरेदी केले होते. आज या शेअरमुळे बिग बी यांना 13,41,18,400 कोटी रुपये मिळवून दिले आहेत. 

संयमाचं फळं मिळालं!

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा दीर्घकालीन स्मॉलकॅप स्टॉक ठेवण्याचा संयम फळाला आलं आहे. कारण DP वायर्सचे शेअर्स 2017 पासून 5 पटीने वाढले आहेत. 5 ऑक्टोबर 2017 रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर स्टॉक लिस्ट झाल्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत अमिताभ बच्चन यांची होल्डिंग 2.45% शेअर्सवर तशीच होती. डीपी वायर्समध्ये बिग बींच्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य जवळपास 13.4 कोटी रुपये आहे.

आता शेअरची किंमत काय आहे? 

सोमवारच्या व्यवहारात NSE वर शेअर 408 रुपये प्रति शेअरच्या आसपास होता. आतापर्यंत कॅलेंडर वर्षात, त्यात जवळपास 58% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना बंपर रिटर्न मिळतं आहेत.  

ट्रेंडलाइन डेटानुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडे फक्त एक स्टॉक आहे. कंपन्यांचा उल्लेख फक्त अशा भागधारकांनाच्या नावाने केला जातो ज्यांचं कंपनीत 1 टक्के पेक्षा जास्त हिस्सा असतो.

यापूर्वी बिग बींच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये फिनोटेक्स , बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि न्यूलँड लॅब्सचे शेअर्स देखील समाविष्ट आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button