पिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी अमित लांडगे

पिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी अमित शिवाजी लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या हस्ते लांडगे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर उपस्थित होते.

आमचे नेते शरद पवारसाहेब, अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा चेहरा-मोहरा बदला आहे. पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचा स्वाभिमानी विचार जनसामान्यापर्यंत पोहचविणार आहे. त्यातून पक्षाचे संघटन वाढविणार असल्याचे अमित लांडगे यांनी निवडीनंतर सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button