breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

इमरान हाश्मीची अभिनेत्री होणार सांगितल्यावर अलीसा खानला घरच्यांनी हाकललं

इमरान हाश्मीची अभिनेत्री होणार सांगितल्यावर अलीसा खानला घरच्यांनी हाकललं

बॉलीवूडमध्ये इमरान हाश्मीच्या वाट्याला जी लोकप्रियता आली त्याचं स्वरुप इतर कलाकारांपेक्षा जरा वेगळं होतं. तो सिरियल किसर म्हणून लोकप्रिय झाला. आणि त्यालाही तसं म्हणवून घेणं फार लागलं नाही. प्रेक्षकांनी त्याला दिलेली ती पोचपावती असल्याचं त्यानं सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांपासून इमरान हा बॉलीवूडपासून लांब आहे. सध्या त्याचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत चेहरे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला मात्र फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही. इमरान हाश्मीसोबत ज्या अभिनेत्रीनं काम करण्याचा निर्णय घेतला होता, त्या अभिनेत्रीला आपल्या कुटूंबाकडून मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये राहणाऱ्या अलीसा खानला जेव्हा आपण इमरान हाश्मीसोबत काम करतो हे घरच्यांना सांगणं महागात पडलं होतं. तिनं बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग केली होती. त्याचा तिला थो़ड्याफार प्रमाणात फायदाही झाला. सलग 12 सुपरहिट व्हि़डिओ तिनं दिलं होते. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षावही झाला होता. जेव्हा तिला बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी आली तेव्हा मात्र मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या बॉयफ्रेंडनं व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

एवढ्या सगळ्या प्रकारानंतर अलीसानं जेव्हा ब्रेक मिळाला तो इमरान हाश्मीच्या एका चित्रपटामध्ये. 2010 मध्ये तिनं माय हजबंड्स वाईफ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिचा प्रभाव फार काही चालला नाही. 2017 मध्ये देखील रवीना टंडन यांच्यासोबत काम करण्याची संधी मात्र या हिंदी चित्रपटातून मिळाली होती. इमरान हाश्ंमीसोबत एका चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अलीसाला तिच्या त्या व्हिडिओ मेसेजवरुन घरच्यांचा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button