breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पडद्यामागील सूत्रधारांचीही सविस्तर माहिती संकलित करा : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे

पिंपरी: गुन्हेगारांची माहिती अपडेट करण्याबरोबरच गुन्ह्यांच्या प्रकरणातील पडद्यामागील सूत्रधारांचीही सविस्तर माहिती संकलित करा, अशा सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली. त्यामुळे गुन्हेगारी कृत्याला पाठबळ देणाऱ्यांचे धाबे दणाणले. गुन्हेगारांशी संबंध असलेल्या आणि गुन्हेगारांना थेट मदत करणारे त्यामुळे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अंकुश शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी गुन्हे शाखेची बैठक झाली. यावेळी आयुक्त शिंदे यांनी गुन्हे शाखेचे युनिट आणि विविध पथकांचे प्रभारी अधिकारी आणि निरीक्षकांकडून त्यांच्या कामाचा आढावा घेतला. कोणते पथक काय काम करते, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा तपास आदींबाबत माहिती घेतली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कोणत्या भागात किती धार्मिक, प्रार्थना स्थळे आहेत, तेथील परिस्थिती काय आहे आदी माहितीही घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचनाही आयुक्तांनी केली. सराईत गुन्हेगारांच्या जवळच्या व्यक्तींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यात गुन्हेगारांचे नातेवाईक, मित्र आणि इतरांचाही समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये पडद्यामागील सूत्रधार समोर येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी कृत्यांना पाठबळ देणारे किंवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांपर्यंत पोलिसांना सहज पोहोचता येत नाही. त्यामुळे अशा सूत्रधारांचीही माहिती संकलित करा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button