breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रव्यापार

मुंबईसोबत पुण्यातही पेट्रोलचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर..!

पुणे |

इंधन दरवाढीने शनिवारी सलग तिसऱ्यांदा उच्चांक गाठला आणि नवी विक्रमी वाढ नोंदवली आहे. अवघ्या लीटरभर पेट्रोलसाठी आता सर्वसामान्यांना शंभर रुपयांहूनही अधिक किंमत मोजावी लागत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी काल पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. इंधनांच्या किमतीत ३५ पैशांनी वाढ झाल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर १११ रुपये ४३ पैसे झाला, तर दिल्लीत त्याने १०५ रुपये ४९ पैसे असा नवा उच्चांक नोंदवला. पुण्यात पेट्रोल १११.२५ रुपयांवर पोहोचलं आहे.

मुंबईत डिझेलचे दर १०२ रुपये १५ पैसे, तर दिल्लीत ते ९४ रुपये २२ पैशांवर गेले आहेत. तर पुण्यात डिझेलचे दर १०० रुपये ४५ पैश्यावर पोहोचले आहेत. इंधनातील ही सलग तिसरी दरवाढ आहे. गेल्या तीन आठवडय़ांतील पेट्रोलमधील ही १५ वी, तर डिझेलमधील १८वी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे, सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. अवघ्या लीटरभर पेट्रोलसाठी एवढे पैसे खर्च करणं आता सर्वसामान्यांना परवडेनासं झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कार्यालयीन कामकाजासाठी अथवा इतर कारणांसाठी दूरवर जाणाऱ्यांना तर दररोज पेट्रोल भरावं लागत असल्याने त्यांनी या दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button