breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

रामदेव बाबा विरुद्ध अ‍ॅलोपॅथी डॉक्टर प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली |

अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या विवादास्पद विधानानंतर योगगुरू रामदेव बाबा नेहमीच चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर देखील त्यांना त्रासाला सामोरे जाव लागत आहे. या त्रासापासुन मुक्त होण्यासाठी त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. रामदेव यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मागितला आहे. रामदेव बाबा यांच्या विधानानंतर इंडियन मेडिकल असोसिएशने त्यांच्या विरोधात देशात अनेक राज्यात एफआर दाखल केले आहेत.

रामदेव यांनी त्यांच्याविरोधात देशातील इतर राज्यात नोंदवलेला खटला दिल्लीत वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याविरूद्ध पाटणा आणि रायपूर येथे गुन्हे दाखल आहेत. यासह रामदेव यांनी या प्रकरणांमध्ये सध्या होणाऱ्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात स्थगितीची मागणी केली आहे. यापुर्वी गेल्या आठवड्यात, योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातला अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रामदेव बाबांवर जीवघेणे आजार पसरवण्याची कृती करणे, शांतता भंग करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IMA (Indian Medical Association) च्या छत्तीसगड विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button