breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

आलिया भट्टला पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स इंडियाकडून ‘पर्सन ऑफ इ इयर’चा पुरस्कार

आलिया भट्टला पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स इंडियाकडून ‘पर्सन ऑफ इ इयर’चा पुरस्कार

मुंबई :प्रातिनिधी 

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. फक्त अभिनयच नव्हे तर सामाजिक कार्यातही तिने सक्रीय सहभाग घेतला आहे. आलिया प्राणीप्रेमी असल्याचं तिच्या चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे. प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल बोलण्यापासून ते अ‍ॅनिमल फ्रेंडली फॅशन निवडण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यापर्यंत, आलिया प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे. तिच्या याच कामाबद्दल पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स इंडियाने तिला ‘पर्सन ऑफ द इयर’चा पुरस्कार दिला आहे.

पेटा इंडियाचे सचिन बंगेरा याविषयी म्हणाले, “आलिया भट्ट केवळ वीगन फॅशनचा प्रसार करण्यासाठी मदत करत नाही तर येणाऱ्या पिढीला प्राण्यांशी प्रेमाने वागण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कुत्रा किंवा मांजर दत्तक घेणे असो किंवा प्राण्यांविरुद्धच्या गुन्ह्यांवर कारवाई करणे असो, तिच्या चाहत्यांशी बोलण्यास आलिया कधीही मागे हटत नाही.”

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button