breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात मद्याची पार्टी ; कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

अलिबाग |

रायगडमधील अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथले कर्मचारी चक्क कार्यालयातच बसून दारू पित असल्याची बाब उघड झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ कर्मचारी इथं दारू पीत बसले होते याचा व्हिडिओ शिवराज्य ब्रिगेडचे सरचिटणीस निलेश पाटील यांनी समोर आणला असून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. निलेश पाटील हे काही कामानिमित्त गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयात गेले असता एका दालनाचा दरवाजा बंद होता. पाटील यांना संशय आला. तेंव्हा त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर आत चक्क दारूची पार्टी रंगली होती. कामकाजाच्या टेबलवरच दारूच्या बाटल्या आणि चकना ठेवला होता. चकण्यासाठी उकडलेल्या शेंगा आणल्या होत्या. हे सर्व दृश्य बघून पाटीलही अवाक झाले. त्यांनी सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.

कॅमेरा सुरू होताच या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली त्यांनी पाटील यांची विनवणी करत हा प्रकार पुढे वाढवू नका. अशी याचना केली. परंतु निलेश पाटील पाटील यांनी याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बनाडे यांची भेट घेवून निवेदन दिले. प्रांताधिकारी कार्यालयात दारू पित बसणे हा प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आणि गंभीर आहे. संबंधित ५ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे . पाटील यांनी अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांचीदेखील भेट घेऊन घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन ढगे यांनी दिले आहे. दरम्यान या प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले.

‘प्रांताधिकारी कार्यालयातील या दारूपार्टीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे . त्यामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान प्रांत कार्यालयात हे प्रकार नवीन नाहीत. अशा दारूच्या पाटर्य़ा अधूनमधून सुरूच असतात. अशी कुजबूज प्रांत कार्यालयाच्या परिसरात सुरू होती.

‘हा प्रकार लांच्छनास्पद आणि निंदनीय आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आम्ही जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसणार आहोत.’

निलेश पाटील, सरचिटणीस शिवराज्य ब्रिगेड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button