breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या कोरोनाशी झुंज देत आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्याने रविवारी सोशल मीडियावरून दिली होती. त्यावेळी त्याने आपण होम क्वारंटाईन असल्याचे म्हटले होते. मात्र रविवारी सायंकाळी अक्षयची प्रकृती खालावल्याने त्याला पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत त्याने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

वाचा :-मुंबईत तब्बल 11,163, पुण्यात 12,494 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

दरम्यान, रविवारी सकाळी ट्विट करत अक्षयने म्हटले होते, ‘आज सकाळी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon.’ अक्षयच्या या ट्विटनंतर सायंकाळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button