breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, शरद पवारांची माहिती

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या  घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवारांना देखील तसे लक्षण दिसत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना कोरोनाची शक्यता असावी. त्यांच्या आता चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार कार्यक्रमात हजर नव्हते, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी सांगितले. आज बारामतीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांचा दिवाळीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोना संकटामध्ये राज्य सरकारने अनेक दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले. आपल्याला काही नियम पाळावे लागले. त्यामुळे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. यंदाच्या दिवाळीत देखील लोकांनी नियम पाळले तर आणि मास्क लावले तर कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही. गेल्या दोन वर्षांत अनेकांचं आर्थिक नुकसान झालं आहे, असंही पवार म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा –

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाने देखील संप करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवावा आणि विषय संपवावा, असं म्हणत पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button