breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अजित पवारांचा पुणेकरांना दिलासा; सोमवारपासून दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहणार

पुणे – जवळपास दोन महिन्यांनी पुणे महापालिका क्षेत्रातील मॉल तसेच अभ्यासिका आणि वाचनालये सुरू होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरू करण्यासदेखील परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील.

त्याचबरोबर ‘पुणे महापालिका क्षेत्रातील मॉल खुले होणार आहेत. सर्व दुकाने रात्री 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. तर अभ्यासिका आणि वाचनालयदेखील 50 टक्के क्षमतेने खुली राहू शकतील’, असे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल येथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. या बैठकीनंतर पुणेकरांना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button