breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मनसेच्या आमदाराने उद्या पक्षावर दावा केल्यास पक्ष त्यांचा होणार का? अजित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनाला सूरूवात

मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षःपाती असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचे विरोधीपक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

४० आमदार आणि काही खासदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. मनसेचा एक आमदार आहे. त्यांनी उद्या पक्षावर दावा केल्यास पक्ष त्यांचा होणार का? असे सवाल देखील अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

दरम्यान, आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सूरू झाले आहे. यासंदर्भात काल विरोधी पक्षांनी रणनिती बौठक घेतली. यावेळी नुकताच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत झालेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका होत आहे. यामुळे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button