breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

अजित गव्हाणे यांचं मोठं अपयश, राष्ट्रवादीत दुफळी.. नक्की काय घडलंय खाली वाचा..!

  • पाच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा ‘फेकला’, आणखी १० ते १५ जन बंडखोरीच्या तयारीत
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतरही राष्ट्रवादीची घरघर थांबेना..!

पिंपरी : विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, आणखी 10 ते 15 पदाधिकारी ही नाराज असून तेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी समोर आल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचं हे मोठं अपयश मानलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात दौरा केला असतानाही राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस बंद झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सध्या अस्वस्थ वातावरण आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या पदावर इम्रान शेख यांना शहराध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळीच आधीच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये शेख यांच्या नियुक्तीवरून नाराजी असल्याची चर्चा होती. कारण,  विशाल वाकडकर यांनी शहरातील सर्वात मजबूत अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फळी निर्माण केली. त्यातूनच अनेक युवा कार्यकर्ते त्यांनी घडविले. ज्यामधून येत्या महापालिका निवडणुकीत अनेकजण उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. नव्या- जुण्यांचा मेळ घालण्यात शेख आणि गव्हाणे अपयशी ठरले असल्याचेही राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे. त्याचे परिणाम नाराज वर्ग आणखी वाढत गेला आणि जाणीवपूर्वक कार्यक्षम कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याची टीका होऊ लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष शुभम पंडित, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष वेदांत माळी, सचिव प्रशांत काळेल यासह अजून दोन अशा पाच पदाधिकाऱ्यांनी इम्रान शेख यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.

  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहर राष्ट्रवादीला मोठा धक्का…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येण्याने हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का ठरू शकतो, अंतर्गत धुसफूस, पदांवरून नाराजी, राजीनामे ह्या गोष्टी राष्ट्रवादीसाठी धोकादायक तर भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतील. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षांतर्गत नाराजी व धुसफूस थांबविण्यासाठी काय शक्कल लढवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button