Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

नाना गायकवाडच्या घरात सापडले एअर रायफल, काडतुसे आणि नोटा मोजण्याचे मशीन

पुणे | कौटुंबिक हिंसाचार, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकावणे, खाजगी सावकारी सह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील नाना गायकवाड च्या घरात पोलिसांना एअर रायफल, 31 जिवंत काडतुसे, दोन नोटा मोजण्याचे मशीन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.याशिवाय त्याच्या घरात सत्तर लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत देखील सापडले आहे. पोलिसांना त्याच्या घरात दोन पाणी कागद मिळाला असून त्यावर 14 लोकांची नावे आहेत. नावाच्या पुढे त्यांना कर्ज आणि दिलेली रक्कम लिहिण्यात आली आहे.

नाना गायकवाड याच्या औंध येथील घराची पोलिसांनी नुकतीच झडती घेतली त्यात हा सर्व मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे. नाना उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड आणि गणेश उर्फ केदार नाना गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत तीन सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधिश एस आर नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.

पोलिसांनी घराची झडती घेतली असता, गायकवाड च्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद स्थितीत आढळले. तसेच त्याच्या डीव्हीआर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये छेडछाड केल्याचे आढळले आहे. याशिवाय घरात असणाऱ्या फाइल्स मधून अनेक कागदपत्रे देखील काढून घेण्यात आले असल्याचे दिसून आले. नाना गायकवाड यांच्या बेडरूममध्ये पैसे मोजण्याची एक मशीन पोलिसांना सापडली आहे अशी माहिती सरकारी वकील विजय फरगडे यांनी शुक्रवारी न्यायालयात दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button