breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा दणका; मुंबईत पेट्रोल ११५ पार

मुंबई – जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. ऐन दिवाळीतही ही दरवाढ सुरूच आहे. आज १ नोव्हेंबर, महिन्याचा पहिला दिवस. तसेच वसुबारस, म्हणजेच दिवाळीचाही पहिलाच दिवस. या मुहूर्तावरही सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा दणका बसला. आज देशात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले. यासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलने ११५ रुपयांचा टप्पा पार केला.

मुंबईकरांना आता एक लिटर पेट्रोलसाठी ११५.५० रुपये आणि एक लिटर डिझेलसाठी १०६.६२ रुपये मोजावे लागत आहेत. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०९.३४ रुपये आणि डिझेलची किंमत ९८.४२ रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तसेच कोलकातामध्ये पट्रोल आता ११०.१५ रुपये आणि डिझेल १०१.५६ रुपये प्रतिलिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईत एक लिटर पेट्रोलचे दर १०६.३५ रुपये आणि डिझेल १०२.५९ रुपये प्रतिलिटर आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर पेट्रोलचे दर लवकरच १२० पार पोहोचतील. यामुळे दिवाळीत महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता असून परिणामी सामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button