अहमदनगर : नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थ्यांसह शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह
अहमदनगर | प्रतिनिधी
टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथील नवोदय विद्यालययात जवळपास चारशे विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान यांच्यातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. या विद्यार्थ्यी व शिक्षकांची रॅपिड अँटेजन टेस्ट केल्यानंतर तब्बल १९ विद्यार्थ्यी व एक शिक्षकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आढळून आली.
या १९ विद्यार्थ्यी तसेच शिक्षकास पारनेर ग्रामिण रुग्णालायात दाखल करण्यात आले असून आकडा जास्त असल्याने सर्वच शिक्षकांसह विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी विद्यालयातील सर्व ४५० विद्यार्थ्यी व शिक्षकांची कोरोना चाचणी करत आहेत.
पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कायम वर राहिला होता, मात्र दोन महिन्यांपासून हा अकडा कमी झाला होता पण एकाच वेळी 20 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने.