breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात अग्नितांडव! फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये 448 दुकाने जळून खाक

पुणे – काल भांडुपच्या रुग्णालयात आग लागल्यानंतर आज पुण्यातील फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागली. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने फॅशन स्ट्रीट क्षणार्धात कवेत घेतलं आणि बघता बघता आगीच्या लोळांनी कापडाची दुकानं व गोदामानं वेढा घातला. साडेतीन तास सुरू असलेल्या या महाभंयकर अग्नितांडवात साडेचारशे दुकानांचा कोळसा झाल्याने फॅशन स्ट्रीटची राखरांगोळीच झाली आहे.

वाचा :-रुग्णविस्फोट! 24 तासांत तब्बल 36 हजार 902 नवे रुग्ण

पुण्यातील नेहमी गजबलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीने मार्केटमधील शेकडो दुकानं कवेत घेतली होती. आगीचे मोठं मोठे लोळ आकाशाच्या दिशेनं जाताना दिसत होते.

अरूंद रस्त्यावरून वाट काढत घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरूवात केली. तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजेच मध्यरात्री १ वाजता आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. “रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ५० जवान आणि १६ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. रात्री १ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत फॅशन स्ट्रीट मार्केटमधील ४४८ छोटी मोठी दुकानं जळून भस्मसात झाली,” अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी माध्यमांना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button