breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

गोकुळची निवडणुक जिंकताच सतेज पाटलांनी शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोल्हापूर – मंगळवारी गोकुळ दूधसंघाच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या दूधसंघाच्या निकालात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. विजय जाहीर होताच काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सतेज पाटील यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना थेट 2 रूपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ आता झाला आहे. दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिलं आहे. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपली आहे. आम्ही निवडून आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे, असं देखील सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांना आम्ही 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. प्रस्थापित व्यवस्थेतील उणिवा दूर करायच्या आहेत, आम्ही मोठी धडक दिली. जिल्ह्यातून आमचं कौतुक होत आहे. चार जागा गेल्या याचं पॅनल प्रमुख म्हणून दुःख आहेच, पण ही लोकशाही आहे. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होतं, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला म्हणजेच राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. मागील 30 वर्ष आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळ दूधसंघावर पकड होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button