breaking-newsTOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

अँड्र्यू सायमंड्च्या निधनानंतर मास्टर ब्लास्टर तेंडूलकरने दिला जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाला…

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. त्याच्या निधनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विटरद्वारे सायमंडला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, ‘अँड्र्यू सायमंड याचे निधन ही आपल्या सर्वांसाठी धक्कादायक बातमी आहे. तो केवळ एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूच नव्हता तर मैदानावरही तो जिवंत होता. मुंबई इंडियन्समध्ये आम्ही एकत्र घालवलेली वेळ माझ्या आठवणी आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोकसंवेदना, असं म्हणत सचिनने देखील त्यांच्यातील असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

रात्री १०.३० वाजता झाला अपघात…

अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. अचानक त्यांची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो जखमी झाला. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे. त्याच्या जाण्याने क्रिकेटमधून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मैदानात हरभजनशी भिडणाऱ्या सायमंड्सवर काळाचा घाला, कार अपघातात निधन

अवघं क्रिकेट विश्व अँड्र्यू सायमंड्च्या अपघाती मृत्युने हळहळलं…

अवघं क्रिकेट विश्व अँड्र्यू सायमंड्च्या अपघाती मृत्युने हळहळलं आहे. आपल्या वादळी खेळीत सामना जिंकवण्याची धमक सायमंडमध्ये होती. आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला अनेकदा अडचणीतून बाहेर काढलं आहे. क्षेत्ररक्षणातही तो अव्वल होता. ओठाला पांढरा रंग लावून खेळणाऱ्या अँड्र्यू सायमंड्ला विसरणे अशक्य आहे. तो आज आपल्यात नाही. यावर अनेकांना विश्वास बसत नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड त्याच्या जाण्याने पार हळहळलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button