breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

सचिन पाठोपाठ युसूफ पठाणही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. युसूफने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबरदारी आणि औषधे घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो’, असे ट्विट युसूफ पठाणने शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास केले.

सचिन तेंडुलकरबरोबरच युसूफ पठाणही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. दोघांनीही इंडिया लिजेंड्सला संपूर्ण स्पर्धेत सामने जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेला १४ धावांनी हरवून चषकावर नाव कोरले.

दरम्यान, सचिनने आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. तसेच आपण होम क्वारंटाईन असल्याचेही सांगितले होते. ‘कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्वांचे मी आभार मानतो’, असे सचिन म्हणाला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button