breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल राणेंनंतर अजून एका भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल; आरोग्यमंत्री टोपेंना….

मुंबई |

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवप्रसाद चांगले यांनी लोणीकर यांच्याविरुद्ध जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यात अपमान आणि भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

यासंदर्भात जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप करत लोणीकर यांनी गुरुवारी जालना येथील कार्यालयात निदर्शने केली होती. परतूर मतदारसंघातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर, असा वादग्रस्त उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना केला. राजेश टोपे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लोणीकर यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. ते म्हणाले की, लोणीकर यांनी राजेश टोपे यांच्या विरोधात बोललेले शब्द चुकीचे आहेत.

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यात त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना थोबाडीत मारण्याची भाषा केली होती. या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. राणे म्हणाले होते की, देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे उलटली हे ठाकरेंना माहीत नाही. मी असलो तर कानाखाली वाजवली असती. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती नसेल? हे किती त्रासदायक आहे. मला समजत नाही की सरकार कोण चालवत आहे. पोलिसांनी राणेंना अटकही केली होती. बऱ्याच घडामोडींनंतर त्यांना कोर्टातून जामीन मिळाला असला तरी त्या काळात महाआघाडी आणि भाजपामधील संबंधही दिसले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवर ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महाराष्ट्र सरकारने केलेली अटक घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कारवाईने आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही, असे नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button