breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

करण जोहरनंतर शाहरुखच्या चित्रपटातूनही कार्तिक आर्यन बाहेर

नवी दिल्ली – बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन याचे लाखो चाहते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटातून रिप्लेस केले होते. त्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा मोठा झटका लागला आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊससोबत कार्तिक एक चित्रपट करणार होता. शिवाय कार्तिकने सायनिंग चेकदेखील परत केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक अजय बहल करणार होते. तर शाहरुखचे रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार होती अशा चर्चा सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकला चित्रपटाबद्दल काही क्रिएटीव्ह अडचणी होत्या, त्याला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नव्हती. कार्तिकने कथेबद्दल असमाधान व्यक्त केले. चित्रपट प्रेम कथेवर आधारित आहे. त्यामुळे कार्तिकला भीती वाटली होती की रोमँटिक चित्रपटाच्या अनुषंगाने कतरिना त्याच्यासमोर वयस्कर दिसेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button