breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

“बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर…”, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना करोनाची लागण

मुंबई |

मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोना आणि ओमायक्रॉचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री यांना करोनाची लागण झाली आहे. नुकतंच सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्या नेहमी विविध पोस्ट टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकंतच तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अखेर “कोरोनाने” मला गाठलचं- #माझीटेस्ट #पॉझिटिव्हआली_आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/4751685771587974

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते….जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असेही आवाहन तृप्ती देसाई यांनी केले आहे. दरम्यान तृप्ती देसाई या बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक होत्या. काही आठवडे घरात राहिल्यानंतर त्या एलिमिनेट झाल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. यानंतर महेश मांजेरकरांनी ५० दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला. त्यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, “५० दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. मात्र बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मनं जिंकलंय हे सर्वात मोठं आहे. मी सामाजिक कार्य करते हे मी आधी लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार आहे,” असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button