पिंपरी / चिंचवड

सहा महिन्यांपासून पाठलाग करत कॉलेजमध्ये धरला तरुणीचा हात : पोलिसांनी ठोकल्या रोमिओला बेड्या

पिंपरी l प्रतिनिधी

मैत्री करण्याची मागणी करत रोमिओने एका तरुणीचा सहा महिन्यांपासून पाठलाग केला. कॉलेजमध्ये तरुणीचा रस्ता आडवून कॉलेज संपल्यानंतर भेट, नाहीतर तुझा जीव घेईन, अशी धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 29) तळेगाव दाभाडे येथे घडली. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी रोमिओला अटक केली आहे.

शिवम विनोद शेळके (वय 20, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा ते सात महिन्यांपासून शिवम शेळके याने पीडित तरुणीकडे मैत्री करण्याची मागणी करत पाठलाग केला. शिवम याचे तरुणीने फोन उचलले नाहीत, तसेच त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही त्यामुळे त्याने वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज व फोन केले.

शिवमचा फोन उचलला नाही, तर घरात येईन, सर्वांना बघून घेईन अशी त्याने तरुणीला धमकी दिली. बुधवारी तरुणी कॉलेजमध्ये गेली असता शिवमने तिचा पाठलाग केला. वर्गात जात असताना तिचा रस्ता अडवून शिवम याने हात पकडला आणि ‘कॉलेज संपल्यानंतर मला येऊन भेट, नाहीतर मी तुझा जीव घेईन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button