breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

20 वर्ष होवून पाणी प्रश्न जैसे थे; दिघीकर एकवटले, फ्लेक्समधून कधी होणार ‘टॅंकरमुक्त’चा नारा

  • अकार्यक्षम नगरसेवकांचा दिघीकरांना फटका

पिंपरी |महाईन्यूज|

दिघीगाव पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट होवून 20 वर्षे लोटली, तरीही दिघीकरांना पुरेस आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही. स्थानिक अकार्यक्षम नगरसेवकांमुळे दिघीकरांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संपुर्ण दिघीत फलक झळकळे असून कधी होणार टॅंकरमुक्त असा सवाल विचारला जात आहे.

महानगरपालिकेत दिघीगावचा समाविष्ट होवून आजही दिघीकर विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. कधी काळी  हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेचे पुर्ण पँनेलने निवडून आले होते. दिघीच्या वाढत्या विस्ताराने मतदारांनी २००७ ला सत्ता परिवर्तन केले. त्यानंतर दोन नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला जो ढासळला तो काय आजही सावरलेला नाही.

२०१२ मध्ये ही राष्ट्रवादीने इथे आपले वर्चस्व शाबूत ठेवले. पण २०१७ मध्ये मोदी लाटेत भाजपने इथे घवघवीत यश मिळवले. पण दिघीकरांच्या मूळ समस्या देखील अजूनही कायम आहेत. त्या समस्या, अडीअडचणी दूर झालेल्या नाहीत. तेथील आरक्षणे विकसित झालेली नाहीत, मुलांना खेळायला मैदाने नाहीत. जेष्ठ नागरिकांना गार्डन, विंरगुळा केंद्राची सोय नाही. व्यायामासाठी नागरिकांना दत्तगडावर जाण्यशिवाय पर्याय नाही.

महापालिकेच्या रुग्णालयासाठी भोसरी अथवा वायसीएमवर अवलंबून रहावे लागत आहे. दिघीचा वाढता विस्तार पहाता २४ बाय ७ पाणी योजना स्वप्नवतच आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न जैसे थे आहे. स्थापत्य विभागाचा ठेकेदार अनुकूल धोरण, दिघीतील खड्डयांना पोषक वातावरण आहे.

नेहमीच येतो पावसाळा, खड्डे घेऊनी अशी परिस्थिती आहे. दिघीचे राजकारण पाण्यभोवती फिरते. दिघीकराची ती मुलभूत गरज आहे. या ‘पाणी बाणी’ मुळे २००२ पासून दिघीकरांनी एकदा निवडून दिलेला नगरसेवक परत महापालिकेत पाठवलेला नाही. या परिस्थितीत आता २०२२ ची महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. मात्र, दिघी परिसरात राष्ट्रवादीने पुन्हा फलकबाजी करीत मूळ पाणी प्रश्नावर नागरिकांचे लक्ष वेधले आहे. दिघीकरांच्या भावनेला हात घालत समस्या, अडीअडचणी, पायाभूत सुविधांवर बोट ठेवले आहे.

राष्ट्रवादी जोमात… विरोधक कोमात

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील सत्ताधा-यांच्या भय आणि भ्रष्टाचारांच्या प्रकरणासह अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, २४ बाय ७ पाणी योजना, स्मार्ट सिटी, गोरगरीबांच्या आर्थिक सहाय देण्यासह आवाज उठविला जात आहे. संपुर्ण शहरात फ्लेक्स लावून सत्ताधा-यांचा गैरकारभारांची पोलखोल करत आहेत. त्यामुळे लांडे हे चांगलेच सक्रीय झाल्याने राष्ट्रवादी जोमात असून लांडेच्या सक्रीतेमुळे विरोधक मात्र कोमात गेल्याचे पाहावयास मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button