breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अफगाणिस्‍तान : काबूल विमानतळावर चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्‍यू

काबूल – अफगाणिस्‍तान मध्‍ये तालिबान्‍यांनी सत्ता काबीज केल्‍यानंतर काबूल विमानतळावर प्रचंड तणाव आहे. देश सोडण्‍यासाठी हजारो नागरिक विमानतळावर गर्दी करत आहे. रविवारी विमानतळावर चेंगराचेंगरी झाली. यामध्‍ये अफगाणिस्‍तान मधील सात नागरिकांचा जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती ब्रिटनच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

अफगाणिस्‍तानमधील परिस्‍थिती अद्‍याप आव्‍हानात्‍मक आहे. आम्‍ही परिस्‍थिती नियंत्रणात राहण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहोत, असेही ब्रिटनच्‍या संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले आहे.काबूल विमानतळावर हजारोच्‍या संख्‍येने नागरिक गर्दी करत आहेत. रविवारी नागरिकांची एकच गर्दी झाल्‍याने गोंधळ उडाला.यावेळी झालेल्‍या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्‍यू झाला.मागील आठवड्यात विमानतळ परिसरात झालेल्‍या गोळीबार ५ जणांचा मृत्‍यू झ्राला होता. मात्र हा गोळीबार कोणी केला याबाबतचा खुलासा तालिबान्‍यांनी केलेला नाही.काबुलमधील गोंधळाच्‍या परिस्‍थितीमुळे नागरिकांना विमानतळावर गर्दी करु नये, असे आवाहन जर्मनी, स्‍विझर्लंड सरकारने आपल्‍या नागरिकांना केले आहे.

काबूलमध्ये अडकलेले १६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले
काबूल विमानतळावर अडकलेल्या 168 प्रवाशांना घेऊन येणारे सी -17 ग्लोबमास्टर विमान सुखरूप भारतात पोहोचले आहे. हे विमान सकाळी 10 च्या सुमारास गाझियाबादमधील हिंडन एअर बेसवर पोहोचले. या प्रवाशांमध्ये 24 अफगाण शीख देखील असल्याचे सांगितले जाते.

दोन अफगाणिस्तान खासदार म्हणजेच सिनेटचाही समावेश आहे. त्यामध्ये तालिबानच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सिनेटर अनारकलीचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button