breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कासारवाडीत विविध क्षेत्रातील महिलांचा आदिशक्ती पुरस्काराने सन्मान

  • कै. भीमराव महादू जवळकर विकास संस्थेतर्फे आयोजन

पिंपरी : प्रतिनिधी

कासारवाडी येथील कै. भीमराव महादू जवळकर विकास संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा ‘आदिशक्ती’ पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. कासारवाडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात गंगादेवी सिंग,तनुजा राणे , विद्या साळवी,जयश्री भगत,ममता कांबळे,अलका दौंडकर,सुप्रिया सुरगुडे,ज्योती आळंदकर ,सुशीला जैस्वाल,स्मिता सालपेकर,स्मिता लांडे आदींचा आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा रघुनाथ जवळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नवरात्री उत्सवाचे औचित्य साधत संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महिलांनी स्वागत केले.या पुरस्कारामुळे यापुढील काळातही चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल या भावना यावेळी पुरस्कार्थी महिलांनी व्यक्त केली.

या उपक्रमाविषयी बोलताना कार्यक्रमाच्या संयोजिका प्रतिभा जवळकर म्हणाल्या की, महिला सक्षम झाल्या असून, जीवनाच्या विविध क्षेत्रांत त्या समर्थपणे वाटचाल करत आहेत. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून, नोकरी, व्यवसायाच्या क्षेत्रातही यश मिळवत आहेत. आपापल्या क्षेत्रात आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असलेल्या महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा ,त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यापुढील काळातही संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button