breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बिग बॉस मराठीच्या घरातून आदिश वैद्य बाहेर!

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन ३च्या या आठवड्यातील बिग बॉसच्या चावडीमध्ये आले बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील दोन लोकप्रिय सदस्य ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन पहिलाची विजेती मेघा धाडे आणि आपल्या सर्वांची लाडकी रेशम टिपणीस. दोघींनी सदस्यांचे भरभरून कौतुक केले, तर काही सदस्यांना ते कुठे चुकत आहेत तेदेखील सांगितले. तसेच सदस्यांसोबत एक मजेदार गेमदेखील खेळल्या. उत्कर्ष आणि सोनाली पाटीलने बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली, तर चुगली बूथद्वारे विशालला त्याच्या फॅनने सोनालीबद्दल चुगली केली ज्यामुळे विशाल दुखावला गेला. बिग बॉसच्या घरातध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यात मीनल शाह, विकास पाटील, संतोष चौधरी (दादुस) आणि आदिश वैद्य हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते. आता या चार जणांमधून कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. अखेर वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे आलेल्या आदिश वैद्यला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

आता सुरू झालेल्या आठवड्यात महेश मांजरेकर यांनी केलेल्या कानउघडणीचा सदस्यांवर काही परिणाम होणार का? कोण बनणार नवा कॅप्टन? कोणते सदस्य होणार नॉमिनेट? कोणकोणते नवे टास्क घरात रंगणार? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोमवार ते रविवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button