अभिनेत्री श्रीपदा यांचे कोरोनाने निधन
मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेलिब्रिटीज कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता दाक्षिणात्य, भोजपुरी आणि बॉलिवूड चित्रपटातील वरिष्ठ अभिनेत्री श्रीपदा यांचे कोरोनाने निधन झाले आहे.
सिंटा यांचे सेक्रेटरी अमित बहल हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, ‘श्रीपदाही कोरोनाच्या आजारासमोर हरल्या. त्यांनी दाक्षिणात्य आणि हिंदीतील अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ही अतिशय दुःखाची बाब आहे की आपण एक चांगली अभिनेत्री गमावली आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. कोरोनाची ही दुसरी लाट फारच घातक आहे, तिने अनेक लोकांचा जीव घेतला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेकांनाही यात प्राण गमवावे लागले आहेत.’
दरम्यान, श्रीपदा यांनी गोविंदा, विनोद खन्ना, धर्मेंद्र, गुलशन ग्रोवर अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते.