breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय
अभिनेत्री जुही चावला, अन्य दोघांविरोधात सदोष याचिका दाखल! २० लाखांचा दंड
नवी दिल्ली |
अभिनेत्री जुही चावला यांनी ५जी बिनतारी यंत्रणा तंत्रज्ञानाला आव्हान देणारी केलेली याचिका सदोष असून प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेली आहे, असे नमूद करून दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका शुक्रवारी फेटाळून लावली आणि त्यापोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
चावला आणि अन्य दोघा वादींनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय केला, असे न्या. जे. आर. मिधा यांनी म्हटले आहे. चावला यांनी सुनावणीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग लिंक आपल्या समाजमाध्यम खात्यावर प्रसारित केली, त्यामुळे अज्ञात व्यक्तींकडून सातत्याने व्यत्यय आणला जात होता, असे न्यायालयाने म्हटले आहे.