breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन

मुंबई – 2020 वर्षाप्रमाणे 2021 हे वर्षसुद्धा अनेक दु:खद बातम्या घेऊन येत आहे. कलाकारांसाठीही हे वर्ष वाईट ठरत आहे. आता हिंदी टीव्हीसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे. दरम्यान, हिना काही कामानिमित्त काश्मीरला गेली होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच ती मुंबईकडे रवाना झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिना खानच्या वडिलांचे मंगळवारी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. हिनाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि जवळच्या व्यक्तींपैकी ते एक होते. ती अनेकदा त्यांच्यासोबतचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करते. यात हिना आणि वडिलांचे जिव्हाळ्याचे नाते दिसून येते.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या सुप्रसिद्ध मालिकेतून हिना घराघरांत पोहोचली. खरंतर तिचा सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय तिच्या वडिलांना सुरुवातीला आवडला नव्हता. मात्र तिची प्रगती पाहून त्यांनी तिला प्रोत्साहन दिले होते.

https://www.instagram.com/p/CBq2Wl_pYHo/?utm_source=ig_embed

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button